मा. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग नवी दिल्ली यांच्या दि. ११ सप्टेंबर २०२० रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगांमध्ये ऑनलाईन ग्राहक तक्रार दाखल करण्याकरीता ई-दाखिल (E Daakhil) हे पोर्टल सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यासअनुसरून राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग महाराष्ट्र मुंबई यांच्याकडून दि. १८ सप्टेंबर २०२० रोजी ई-दाखिल (E Daakhil) पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. सदर ई-दाखिल (E Daakhil) पोर्टल केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र (NIC) नवी दिल्ली या विभागाकडून तयार करण्यात आलेले आहे. हि सुविधा सद्यस्थितीत चालू असलेल्या फायलिंग सुविधे व्यतिरिक्त पुरविण्यात आलेली आहे व सदरची सुविधा पूर्णपणे ऐच्छिक आहे म्हणजेच अनिवार्य नाही.
सदर माध्यमातून केवळ तक्रार दाखल करता येईल. तक्रार दाखल केल्यानंतर सुनावणी करीता व इतर कार्यवाहीकरीता आयोगासमोर किंवा संबधित मंचासमोर उपस्थित राहणे आवश्यक आहे याची कृपया नोंद घ्यावी. सदरची सुविधा निशुल्क असून राज्य आयोग व जिल्हा आयोगासमोर तक्रार दाखल करण्याकरीता आवश्यक असलेली फी भरणे बंधनकारक असेल.
ई-फायलिंगकरीता येथे क्लिक करा - E Daakhil E-Filling